पिंपरी चिंचवड दि १६ :-कोविड-१९ कोरोना लसीकरणास आज प्रारंभ झाला या कार्यक्रमाचे उद्घाटन महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या हस्ते करण्यात आले . जिजामाता रुग्णालयात झालेल्या या कार्यक्रमास खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे,उपमहापौर केशव घोळवे ,सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हर्डीकर ,शिवसेना गटनेते राहुल कलाटे, मनसे गटनेते सचिन
चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसेवक संदीप वाघेरे, शैलेश मोरे, प्रेमकुमार उर्फ बाबू नायर, नगरसेविका उषा वाघेरे,निर्मला कुटे, सविता खुळे,निकिता कदम ,अर्चना बारणे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी लक्ष्मण गोफणे ,वर्षा डांगे आदी मान्यवर उपस्थित होते