पुणेः- इंदिरा वसाहत येथे शिव साई मित्र मंडळामध्ये गणेश जयंतीनिमित्त कैलास गायकवाड मा नगरसेवक पुणे मनपा अध्यक्ष विधी समिती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय अहिरे , सुभाष सोनवणे, बापू कदम, मदन मारुडा, नितीन मारुडा उपस्थित होते.
अष्टविनायक मित्र 37 औंध रोड पडाल वस्ती येथे कैलास गायकवाड मा नगरसेवक पुणे मनपा मा अध्यक्ष विधी समिती यांचा सत्कार करण्यात आला व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. राजू साठे, माऊली भिसे, अंकुश साठे, अमित खरात व निनाद आलूवालिया सरचिटणीस पुणे शहर काँग्रेस ,तसेच शिवाजी मित्र मंडळ , तानाजी मित्र मंडळ, आझाद क्रिडा संघ, जय विजय संघ, अजिठा मित्र मंडळ , परदेशी चाळ मित्र मंडळ , फ्रेंड्स युथ क्लब बोपोडी याठिकाणी मंडळा तर्फे कैलास गायकवाड मा नगरसेवक पुणे मनपा मा अध्यक्ष विधी समिती यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. विठ्ठल आरुडे, मयुरेश गायकवाड , साजिद शेख उपस्थित होते.