चिखली मोरेवस्ती : श्री गणेश व्यायाम मंडळाच्या मुलींनी यशस्वीरित्या पूर्ण केला चौथा मशाल दौड वर्ष मुलींनी सलग छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. किल्ले तिकोणा ते मोरेवस्ती हे ४४ किलोमीटर अंतर पार करून, या शौर्यशाली मुलींनी इतिहासातील शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांच्या पराक्रमाची आठवण करून दिली. थंडीच्या कडाक्यात, अंधारातील खडतर मार्ग पार करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. हा उपक्रम केवळ सहनशक्ती आणि धैर्य यांचे प्रतीक नसून, मावळ्यांनी कशा प्रकारे गड सर करत पराक्रम गाजवला याची अनुभूतीही देणारा आहे.
विशेष सादरीकरण केलेली यामधील प्रमुख ठिकाणे:
1. शिक्षण प्रसारक मंडळाची मराठी माध्यम शाळा, निगडी
2. लर्निंग कॅम्पस स्कूल
3. राजर्षी शाहू महाराज विद्यालय
4. प्रतिभा कॉलेज
5. मोहन नगर
6. स्वराज सोसायटी, मोरेवस्ती
7. पार्श्र्व प्लॅटिनम सोसायटी
गर्वास्पद सहभाग या ऐतिहासिक उपक्रमात पुढील विद्यार्थिनींनी भाग घेतला:
वयोगट ९ ते १५ :
अनन्या जोशी, राधिका पवार, अवंती पांडे, सानिया सहाने, दीप्ती पाटील, दुर्वा शिंदे, पूर्वा शिंदे, आराध्या व्हरंबळे, निमिषा गायकवाड, रेवा आव्हाड, सानिका माने, दीप्ती पाटील, श्वेता लिमण
मार्गदर्शक व प्रशिक्षक
संजय शेलार
प्रफुल्ल प्रधान
या सर्व मुलींनी परिश्रमपूर्वक गडचढाई व मशाल दौड पार पाडून शिवप्रेम आणि शौर्याचे उदाहरण घालून दिले. हा उपक्रम भविष्यातही सुरू राहावा अशी अपेक्षा असून, या मुलींच्या धाडसाचे संपूर्ण समाजातून कौतुक होत आहे.





















































