पुणे : वडगावशेरीतील साईनाथ नगर येथील जुना मुंढवा रस्त्यावर महानगरपालिकेच्या वतीने भाजी मंडई बांधण्याचे २०१७ पासून काम सुरु होते. तसेच ते काम अर्धवट अवस्थेत पाडून होते. याचा लोकमतने पाठपुरवावा केल्याने अखेर दोन वर्षांनी मंडईचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सुमारे दीड कोटी खर्च करून बांधकाम करण्यात आले आहे. या कामाची पाहणी नगरसेवक संदीप जऱ्हाड, विकेंद्रीत कामे परिमंडळ १ चे कार्यकारी अभियंता राजेश बनकर, सहउपायुक्त सुहास जगताप, कनिष्ठ अभियंता महादेव बोबडे, ज्ञानेश्वर लाखे, प्रवीण सातव, स्वप्नील कांबळे, बालाजी हुस आणि नागरिकांनी केली.
या मंडईचे काम अधर्वट अवस्थेत असल्याने याला कचरा डेपोचे स्वरुप आले होते. ही बाब ‘लोकमत’ने डिसेंबर २०१८ मध्ये प्रकाशात आणली होती. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. स्थानिक नगरसेवक जऱ्हाड यांनी निधी मंजूर करून घेण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करून काम मार्गी लावले. त्यामुळे रस्त्यावर बसून भाजी विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना आता भाजीचे गाळे उपलब्ध होऊ शकणार आहेत. या इमारतीमध्ये केवळ भाजी मंडई नसून दुसऱ्या मजल्यावर बहुउदेशीय हॉल बांधण्यात आला आहे. हॉल मोठा असल्याने सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करता येणार आहेत. काम अंतिम टप्प्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
चौकट
एकूण ८ गुंठ्यांमध्ये मंडई बांधण्यात आली आहे. प्रशस्त बहुउद्देशीय हॉल बांधण्यात आला आहे. पाण्याची टाकी बांधण्यात आली असून स्वच्छता ग्रह बांधण्यात आले आहे. हॉल मध्ये विवाह समारंभ, वाढदिवस, मुंज , सामाजिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आदी साजरे करता येणार आहे. तसेच पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. कोट मंडई चे काम प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहे. सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. सुरुवातीला हॉलचे नियोजन नव्हते. मात्र नागरिकांच्या मागणीनुसार वडगावशेरीत पहिला सुसज्ज बहुउद्देशीय हॉल बांधकाम विभागाच्या मंजूरीने बांधण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना शुभकार्यासाठी हॉल उपलब्ध होणार आहे.
– संदीप जऱ्हाड, नगरसेवक.