आज शनिवार २७ जून २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजता पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्री. श्रावण हर्डीकर फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत. यामध्ये ते कोरोनाबाधित पण लक्षणे नसलेल्या रुग्णाचे घरीच विलगीकरण (होम आयसोलेशन) केल्यानंतर कोणती दक्षता घ्यावी? या विषयावर बोलणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन ‘पिंपरी चिंचवड महापालिका फेसबुक लाईव्ह’ यांनी ‘कोरोनसोबत जगताना’ या विषयांतर्गत केले आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी PCMC Smart Sarathi / pcmcindia.gov.in या लिंकचा वापर करावा.





















































