पुणे: सिंहगड रोड वरील विश्रांती नगर येथे वास्तव्यास असलेल्या सुप्रसिद्ध मराठी चित्रपट व नाट्य अभिनेत्री ज्यांनी गाढवाचं लग्न या नाटकातून प्रेक्षकांवर आपल्या कामाने गारूड केलं होतं अशा जयमालाताई ईनामदार व हिंगणे, आनंदनगर, माणिकबाग आणि विठ्ठलवाडी या भागात राहणाऱ्या त्यांच्या सहकलाकारांना ( वाद्यवृंद, बँक स्टेज आर्टिस्ट इ. ) प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने अन्नधान्याचे किट देण्यात आले. यावेळी सर्व कलाकारांनी मनापासून समाधान व्यक्त केले.
कोरोनाच्या या महामारीमुळे सर्व सामान्य नागरिकांबरोबरच इतरही अनेक क्षेत्रातील मंडळींना याचा फटका बसला आहे. चित्रपट, नाट्य सृष्टीतील अनेक कलाकार सनसिटी, माणिकबाग येथे वास्तव्यास आहेत. या मंडळींना प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने वेळोवेळी अन्नधान्याचे किट देण्यात आलेले आहे.
माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीने कलाकारांना अन्नधान्य वाटप
Share this: