पुण्याचे माजी उपमहापौर व विद्यमान नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीने सिंहगड रोड परिसरातील गर्दीची ठिकाणे, मोठ्या सोसायट्या, दुकाने अशा ठिकाणी सॅनिटायझर मशीन बसवण्यास सुरुवात झाली आहे. या सॅनिटायजर मशीनचे उद्घाटन पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर मा. मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या शुभहस्ते सोशल डिस्टन्सींग चे नियम पाळून आज करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी प्रसन्नदादा जगताप यांचे कुटुंब, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दोन अडीच महिने सातत्याने जगताप यांच्या समवेत असणारा मित्रपरिवार अर्थात सर्व कोरोना योद्धे या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते.
नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी हात धूताना सँनिटायझर वापरण्यासाठी हाताचा वापर केल्यास तो कदाचित योग्य नसल्याने पायाच्या खटक्याच्या माध्यमातून हात स्वच्छ करण्यासाठी या मशीनचा उपयोग करता येणार आहे. यातून सॅनिटायजर वापरताना होणारा एकमेकांच्या हाताचा स्पर्श टाळता येईल.
सध्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपा ने रेड झोन नसलेल्या भागात सकाळी ७ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत काही अटींवर दुकाने उघडी ठेवणेसाठी व नागरिकांना खरेदीसाठी मोकळीक दिली आहे. अशा वेळी सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करणे व मुख्यत्वेकरून आपले हात वारंवार साबणाने अथवा सॅनिटायजर ने स्वच्छ करणे हे गरजेचे आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी सुध्दा नागरिकांना हात स्वच्छ करणेची सुविधा मिळावी या उद्देशाने सॅनिटायजर मशीन बसविण्यात आले आहेत. लवकरच अशाप्रकारच्या सॅनिटायझर मशीन हॉस्पिटल, शाळा व मोठमोठ्या शॉपच्या दारामध्ये बसवण्याचा मानस प्रसन्नदादा जगताप यांचा आहे.
माजी उपमहापौर,नगरसेवक प्रसन्नदादा जगताप यांच्या वतीने सॅनिटायजर मशीन बसवण्यास सुरुवात. महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते उद्घाटन…
Share this: