.*
*पिंपरी* : *दिनांक १ मे २०२१* : यशस्वी एकेडमी फॉर स्किल्स संस्थेतर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘यशोगाथा’ विशेषांकाचे प्रकाशन चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमचे प्रमुख पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना गिरीश प्रभुणे यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या व त्यांनी ‘यशस्वी’ संस्थेतर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली, तसेच संस्थेच्या कौशल्य विकास प्रशिक्षणातील योगदानाबद्दल कौतुक व्यक्त केले. यावेळी त्यांनी पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या विविध उपक्रमांबद्दलही माहिती दिली.
याप्रसंगी यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या अधिष्ठाता डॉ.सुनिता पाटील,पवन शर्मा,योगेश रांगणेकर,अभिजित चव्हाण उपस्थित होते.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एरव्ही समारंभपर्वक विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत होणारा हा प्रकाशन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्यात आला.