९ मे जागतिक माता दिन, आजकाल कोणी माय,आऊ मदर ,मम्मी, आई ,मा, मातोश्री,अम्मा,मम्मे अशा नावानी तिला संबोधतात. आई म्हणजे आत्मा आणि ईश्वाराचा अतूट संगम आहे.ती आहे तोवर तिची किम्मत कळत नाही ती नसताना तिची किंमत कळते
स्वतः उपाशी राहून आपल्या पोटाला चिमटे काढत बाळाला घडवते ती माय, त्याचे सगळे चांगले – वाईट कामे पोटात घालते ती माय!
ऐतिहासिक दाखल्यात देखील अनेक उत्तम जोड्या माय लेकरांच्या,लेकींच्या आहेत
माता जिजाऊ ,झाशीची राणी ,आहिल्याबाई होळकर,सुषमा चव्हाण, जया बच्चन, रिमा लागू,सुनिता विल्यमस् ,कल्पना चावला,आशा भोसले,माई मंगेशकर ,हिरकणी,सिंधूताई सपकाळ अशा अनेक महिला उत्तम माता देखील झाल्या.
भारतीय परंपरेनुसार अनेक मातांमुळे उत्तम हिरे भारताला मिळाले.
ती प्रसंगी लेकरा साठी घरासाठी जीव देते पण अशी निरागस साधी अनेक लेकरांची आई होते.जेव्हा मी सिंधुताईंना विचारले हे कार्य तुम्ही का स्वीकारले तर त्यांचे उद्गार डोळ्यात पाणी आणणारे होते की, त्याला मी जरी दुध पाजले नसले तरी त्याच्या मागे उभे राहण्याचं सामर्थ्य स्वामी समर्थांनी दिल्याने आज समर्थपणे अनेक लेकरांची मी आई आहे अन् राहेन
या देवी सर्व भुतेषु मातृ रूपेण संस्थिता असं जेव्हा आपण म्हणतो ती लेकरांची एकच आई असते.तिचं अस्तित्व आपले आयुष्य खुलवून टाकतात. ती एक उत्तम स्त्री महिला पत्नी काकू आत्या मामी आजी सगळ्या भुमिका निभावते ती आई असते.आत्मा अन् ईश्वराचा अतूट अनाकलनीय संगम ती असते .म्हणूनच म्हटले आहे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी!
शब्दांकन- तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादिका -पीपीसी न्यूज लाईव्ह, पुणे )