आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही,असं म्हणतात की देवाला सगळ्यांकडे जाणे शक्य नव्हते म्हणून त्याने आईला घरोघरी पाठवले,एका आईला अनेक मुले असू शकतात पण प्रत्येकाला आई एकच असते,त्या मुळेच तिची महती प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळी असते,कोणाला ती जननी, जीवनदायिनी असते,कोणाला ती ज्ञान देणारी असते,तिला काय आवडते याकडे कोणाचे फारसे लक्ष नसते,पण तिचे मात्र घरातल्या प्रत्येकाला काय आवडते याकडे बारीक लक्ष असते,ती सकाळी उठल्या पासून घरात आणि घरासाठी कष्ट करत असते,तीच गृहलक्ष्मी असते,ती नोकरी साठी बाहेर गेली तरी घर हिंडते आकाशी चित्त तिचे पिला पाशी अशी घराकडे तिची ओढ असते,घरात आई असते म्हणूनच घराची सर्वांना ओढ असते,आई सध्या ऑनलाईन, वर्क फ्रॉम होम,असली तरी तिचे घरात असणं हे सुद्धा घराला आवडणारं असतं, हवं हवंस असतं, ती घरातल्या प्रत्येकाला त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला करून घालते,तिला अन्नपूर्णा म्हणतात सगळे, एक आई किती भूमिका करत असते आणि त्या सुद्धा सराईत पणे, तीच निर्माती,तीच स्त्री, मीही लेखिका,तीच दिग्दर्शक,तीच नटी, तीच सूत्रधार, सगळा रंगमंच तिचाच,या तिच्या परिपूर्ण कामगिरीला सलाम,तिच्या चरणी या लेखाचे सोने अर्पण आजच्या मातृ दिनी, हॅप्पी मदर्स डे!
शब्दांकन – निवेदिता मेहेंदळे (लेखिका पुण्यातील महिला तबलावादिका,कीर्तनकार, नाट्यलेखिका ,दिग्दर्शिका आहेत .)