देहू आणि आळंदीचा पायी पालखी सोहळा इतिहासात पहिल्यांदाच रद्द करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. आज पुण्याच्या काऊन्सिल हॉलमध्ये आषाढी वारी बद्दल निर्णय घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वारकऱ्यांच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुका दशमीला पंढरपूरला जाणार आहे. या पादुका हेलिकॉप्टर, वाहन किंवा विमानाने नेण्याचा निर्णय नंतर होणार आहे. देहू आणि आळंदीहून पायी दिंडी न नेण्याबाबत वारकरी आणि प्रशासनामध्ये बैठकीत एकमत झालं. यावेळी,आळंदी देवस्थानचे चोपदार, आळंदी, देहु आणि सोपानकाका संस्थानच्या विश्वस्तांनी त्यांच्या भूमिका मांडल्या. तसेच वारकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या वेगवेगळ्या भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ऐकून घेतल्या.
यंदाचा पालखी सोहळा रद्द…
Share this: