पुणे : दिनांक २८ ऑगस्ट २०२१* : मनुष्यबळ व्यवस्थापकांच्या राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट – एनआयपीएम च्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत विश्वेश कुलकर्णी बहुमताने विजयी झाले आहेत.
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट- एनआयपीएम ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था गेल्या पाच दशकांहून अधिक काळ मनुष्यबळ विकास या व्यवस्थापकांच्या प्रश्नांसंदर्भात तसेच औद्योगिक संबंध, कामगार समाज कल्याण तसेच प्रशिक्षण व विकास या क्षेत्रात कार्यरत असून देशात ५३ विभागाअंतर्गत संस्थेचे सुमारे दहा हजार सभासद आहेत.