पुणे, ५ मे २५ – सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या सिंबायोसिस ज्युनिअर कॉलेज, किवळेच्या विद्यार्थ्यानी फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाविद्यालयातील एकूण १७१ विद्यार्थी डिस्टिंक्शनसह उत्तीर्ण झाले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सिंबायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रो. डॉ. एस. बी. मुजूमदार, सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटीच्या प्रधान संचालिका डॉ. स्वाती मुजूमदार, प्राचार्या भावना नरसिंगोजू , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महाविद्यालयाच्या कला , विज्ञान आणि वाणिज्य शाखेचे प्रथम तीन क्रमांकाचे निकाल खालील प्रमाणे-
कला शाखा :
प्रथम क्रमांक : जेनी सॅम्युअल (९१.८३% )
विज्ञान शाखा :
प्रथम क्रमांक : ब्रायन डिसूझा (८५.३३%)
वाणिज्य शाखा :
प्रथम क्रमांक : दिया दार्जी (९४.३३%)



















































