पुणे: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देण्यात येणारी लस पुणे महानगरपालिकेच्या वतीने आपल्या सिंहगड रोड परिसरातील डॉ. राजीव जगताप हॉस्पिटल येथे आज सकाळी १० वाजता देण्याची सुरूवात करण्यात आली.
या उद्घाटन समारंभाप्रसंगी माझ्यासह डॉ. राजीव जगताप, डॉ. प्राजक्ता जगताप, डॉ. पुनर्वसू जगताप, डॉ. मधुरा अभंग, डॉ. पाखरे, डॉ. दिपक परगळे, डॉ. असाराम काकडे यांच्या नेतृत्वाखाली ही लस देण्यास सुरूवात झाली. आपल्या भागातील आरोग्य निरीक्षक मा. केतनजी निकम सर यांना पहिली लस देण्यात आली. सिंहगड रोड परिसरात पहिला कोरोना रुग्ण सापडला होता. आणि आता पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोरोना प्रतिबंधक लस देखील प्रथम आपल्याच भागात दिल्याबद्दल महापालिकेचे आभार व या लसीसाठी माझ्या प्रयत्नांना फळ आल्याबद्दल समाधान वाटत आहे. यावेळी सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर्स, नर्सेस यांना देखील ही लस देण्यात आली.
यावेळी वॉर्ड ऑफिसर जयश्री काटकर उपस्थित होत्या. तसेच याप्रसंगी सोनी बळीद, सुनिता रसाळ, निलम लोखंडे, मल्लेश धनगर, मंदिरा चाचर हा मेडिकल स्टाफ तसेच नगरसेविका अश़्विनीताई पोकळे, मंजुषाताई नागपुरे, ज्योतीताई गोसावी व नगरसेवक हरिदास चरवड यांच्यासह आमचा मित्र परिवार राहुल जोशी, नितीन खाटपे, राजाभाऊ महाडिक, अभिजित कदम उपस्थित होते.