पिपीसी न्यूज: प्रतिनिधी: अजय जाधव.
दिनांक 2 ऑगस्ट रोजी पीडित फिर्यादी यांच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात प्रेम प्रकरणाचा बनाव रचून तक्रारदाराला honey ट्रॅप करत, बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत खंडणी वसूल करण्याचा प्रकार तीन महिला सोबत त्यांचा साथीदार म्हणून पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ उभे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या पिंजऱ्यात खुद्द पोलीस दलातीलच काशिनाथ उभे यांचे आरोपी म्हणून नाव समोर आल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादी यांच्या तक्रारीवरून अवंतिका सोनावणे, आरती गायकवाड, पुनम पाटील यांच्या विरोधात प्रथम गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याप्रमाणे अधिक तपास केला असता पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ उभे यांचा सदर गुन्ह्यात सहभाग निश्चित करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक काशिनाथ उभे सध्या पोलीस मुख्यालयात नियुक्तीस आहेत. पुणे पोलीस दलातील सर्व चर्चित पोलीस म्हणून त्यांना ओळखले जाते. गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच ते पसार झालेले आहेत अशी माहिती पोलिसांनी दिली.