पुणे दि. 7 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागामार्फत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात बी.सी.ई.बी.सी मुलींचे शासकीय वसतीगृह राजगुरुनगर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
पाबळरोड येथील वसतिगृहात इयत्ता ८ वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती, विमुक्त जमाती भटक्या जाती, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग व अनाथ मुलींना रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल बी.सी.ई.बी. सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, राजगुरुनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालानी केले आहे.





















































