नियोजन बैठकीस चांगला प्रतिसाद
पुणे |(ppcnews.in)
पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकजनशक्ती पार्टी रामविलास या पक्षाची आज एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, पुणे येथे आज १४ जून रोजी सायंकाळी चार वाजता पार पडली. पक्षाचे पुणे शहर, जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या अध्यक्षते खाली ही बैठक झाली.
यामध्ये आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा गंभीर विचार करण्यात आला असून, येत्या तीन महिन्यांत संपूर्ण शहर व जिल्हा पिंजून काढण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
बैठकीत ठरल्याप्रमाणे, सर्व पदाधिकारी शाखा उद्घाटनावर विशेष भर देणार असून, निवडणुकीच्या ऐन वेळेस स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कोणा बरोबर युती करायची याचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीस अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संजय आल्हाट, कृष्णा पवार, अभिजीत पाटील, आलोक गिरणे, रणजीत सोनावळे, नारायण भिसे, कल्पना जावळे, योगिता साळवे, रुक्मिणी केंद्रे, आनंद शिंदे, विजय अठवाल, राजू आढाव, जयवंत कांबळे, शिवप्रसाद ईश्वरकट्टी, अनिल मोळवणे, प्रवीण बनसोडे, राम आल्हाट, जमालुद्दीन खान आणि राहुल उभे यांचा समावेश होता.
स्वबळावर निवडणूक लढवण्याचा स्पष्ट इशारा या बैठकीतून देण्यात आला.





















































