पि पी सी न्यूज नेटवर्क; प्रतिनिधी; अजय जाधव.
आझाद नगर चौकातील लोहगाव येथील मेन रोडवरील महाले ज्वेलर्स या सराफी पेढी त १ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता रहदारीच्या वेळी दोन अनोळखी इसम ग्राहक म्हणून दुकानात आले. त्यांनी सोन्याची चेन घेण्याचा बहाणा करून लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून दुकानात लावलेल्या ७३ हजार किंमतीच्या दोन सोन्याच्या चैन जबरदस्तीने चोरी करून आरोपी फरार झाले. सदर गुन्ह्याची फिर्याद विमानतळ पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहे.
सदर गुन्ह्याचा तपास करत असताना विमानतळ पोलिसांच्या हाती आरोपीबद्दल माहिती मिळाली. पोना विनोद महाजन व पोना हरून पठाण त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करून कात्रज येथे सापळा लावून एका बावीस वर्षीय गुन्हेगारास शिताफीने ताब्यात घेतले. आरोपीने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी मोटरसायकल व सोन्याची चेन असा ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल विमानतळ पोलिसांनी हस्तगत केला व आरोपीवर गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शांताराम कोळळुरे हे करत आहेत.
सदरची कारवाई ही नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर रोहिदास पवार ,पोलीस उपायुक्त परी-०४ पुणे शहर ,किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, यांच्या आदेशाने भरत जाधव वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर व मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलीस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सचिन जाधव पोलीस कर्मचारी गणेश साळुंके ,उमेश धेडे, रमेश लोहकरे,विनोद महाजन,हरून पठाण, अंकुश जोगदंडे, नाना कर्चेयांच्या पथकाने केली आहे





















































