(ppcnews.in)
पिंपळे सौदागर परिसरात गणेशोत्सव काळात हजारो भाविकांचे श्रद्धास्थान ठरणाऱ्या प्रसिद्ध “सौदागर चा राजा” या गणेश मंडळाच्या वतीने एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. मंडळाच्या स्थापनेपासून ज्या चौकात बाप्पाची प्रतिष्ठापना केली जाते, त्या चौकाचे नामकरण थेट “सौदागरचा राजा चौक” असे करण्यात आले. या नावाचा भव्य फलक उभारून त्याचे लोकार्पण माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सोहळ्यावेळी परिसरातील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळाला. यावेळी युवा नेते उमेश काटे, संजय भिसे, मंडळाचे अध्यक्ष संजय अंकुश काटे, राजाराम काटे, अशोक काटे, नरहरी काटे (पाटील), धीरज काटे (पाटील), संजय काटे, गजानन वांजळे, प्रसाद शिंदे, संतोष बोडके, श्रीकांत जाचक, निलेश कुंजीर, प्रसाद कुंजीर, संदीप काटे, कुणाल काटे (पाटील), संग्राम काटे, आदित्य भिसे, अक्षय काटे, रोहन काटे, निखिल काटे (पाटील), आदित्य काटे, प्रतीक चव्हाण, यश चव्हाण, स्वप्नील काटे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे परिसरातील गणेशभक्तांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. “सौदागर चा राजा” हे केवळ मंडळ नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकी जपणारे आणि सांस्कृतिक वारसा जपणारे शक्तिकेंद्र बनले आहे, असे गौरवोद्गार नाना काटे यांनी काढले. त्यांनी शिस्तबद्ध आणि सामाजिक उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या या मंडळाच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या.