भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये आयोजन
पुणे:
भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजमध्ये २५ आणि २६ फेब्रुवारी २०२५ रोजी तृतीय’ इन्ट्रा मल्टिलिंग्विस्टिक क्लायंट कौन्सिलिंग स्पर्धा ‘आयोजित करण्यात आली होती. ही स्पर्धा कॉलेजची मंथन समिती आणि आयक्यूएसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी कायदेशीर ज्ञानाने समृद्ध उत्कृष्ट समुपदेशन कौशल्य दाखवले.निमिषा जैन हिने अमृत चषक जिंकून स्पर्धेत प्रथम स्थान मिळवले. पहिल्या उपविजेत्या बरीन जहेरा हिला कल्पवृक्ष चषक प्रदान करण्यात आला. दुसऱ्या उपविजेत्या निनाद गोळे याने कौस्तुभ चषक जिंकला, तर कमल किशोर याने ऐरावत चषक मिळवला.सान्या ओबेरॉय हिला केशव चषक, तर राघव अग्रवाल याला माधव चषक प्रदान करण्यात आला. भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या प्राचार्या डॉ. उज्वला बेंडाळे आणि मंथन समितीने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.





















































