वाहतूक कोंडी टाळण्यासाठी भोसरी उड्डाणपुलाखाली आळंदीकडून येणाऱ्या वाहतुकीत बदल केला आहे. नागरिकांना त्यांच्या हरकती आणि सूचना वाहतूक विभागाकडे पाठविण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सागितले.
भोसरी चौकात आळंदी रोडवरून येणाऱ्या वाहनांना अंकुशराव लांडगे सभागृह व चाकणकडे जाण्यासाठी चौकातून उजवीकडे वळण्यास बंदी आहे. या वाहनांनी भोसरी चौकातून डावीकडे वळून पुढे ५० मीटरवर असलेल्या पीएमटी चौकातून उजवीकडे वळून इच्छित स्थळी जावे, असे वाहतूक विभागाकडून सांगण्यात आले आहे.
नागरिकांना काही हरकती आणि सूचना असतील तर त्यांनी पिंपरी – चिंचवड वाहतक विभागाकडे देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा बदल १४ जून ते २८ जून या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात असणार आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचना यांचा विचार करून अंतिम आदेश देण्यात येणार असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले आहे.





















































