किल्लारी( एल. पी. उगिले) काही गुन्हेगार अति हुशार असतात. आपल्या भागात चोऱ्या केल्या आणि त्या चोरीतील मुद्देमाल आपल्याच भागात विकला तर त्याची कुणकुण आज ना उद्या पोलिस प्रशासनाला लागतेच. हे ओळखून ते एका ठिकाणी चोरी करतात आणि भलतीकडेच चोरी केलेला माल विक्री करतात. त्यामुळे ते सहजासहजी पोलिसांच्या हाती लागत नाहीत. काही चोर तर गुन्हा केल्यानंतर काही दिवस दुसऱ्या राज्यात जाऊन आश्रय घेतात. परिणामतः पोलिसांना त्या गुन्ह्याचा लगेच सहजासहजी तपास लागत नाही. अशीच भावना ठेवून एक दुचाकी चोर पुण्या-मुंबईकडे जाऊन दुचाकी चोरी करायचा आणि त्या दुचाकींना लातूर जिल्ह्यात आणून विक्री करायची असे प्रकार करत होता. लातूर जिल्ह्यातील किल्लारी पोलीस स्टेशन येथील दबंग पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांनी आपल्या पोलिस स्टेशन हद्दीतील अवैध धंद्याच्या संदर्भात तपास करायला सुरुवात केली होती. दरम्यान लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मतराव जाधव, उपविभागीय पोलिस अधीक्षक राजीव नवले, आणि किल्लारी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केल्यानंतर अमोल गुंडे यांच्या पथकाला गुप्त बातमीदार मार्फत खात्रीशीर माहिती मिळाली कि, एक व्यक्ती संशयास्पदरित्या वेगवेगळ्या दुचाकीवरून या भागात फिरत असतो. या माहितीच्या आधारे अमोल गुंडे आणि त्यांच्या पथकाने औसा तालुक्यातील कार्ला येथील अजय राजेंद्र काळे (25 वर्ष) यास नाकाबंदीच्या दरम्यान ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्याने कबूल केले की, पुणे विभाग व परिसरातून मोटारसायकल चोरी करून तो लातूर जिल्ह्यात विकायचा. त्यास अटक करून अधिक तपास केला असता, त्याच्याकडून ठिक ठिकाणाहून चोरीस गेलेल्या 13 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या जप्त केलेल्या मालाची किंमत अंदाजे आठ लाख रुपये आहे. या आरोपीकडून अशा स्वरूपाचे अनेक गुन्हे उघड होऊ शकतील. अशी अपेक्षा किल्लारी पोलिसांना आहे. या धाडसी कारवाईत पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंडे यांच्यासोबत पोहेका अनिल शिंदे, गौतम भोळे, बाबासाहेब इंगळे, गणेश यादव, उमाकांत चपटे यांचा समावेश होता. किल्लारी पोलिसांच्या धडाकेबाज मोहिमेमुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
मुंबई पुणे भागातील दुचाकी चोर!! किल्लारी पोलीस त्यावर शिरजोर.
About the author
Related Articles
-
वापरात नसलेल्या वस्तू जवळच्या आर.आर.आर. केंद्रात जमा करून पुनर्वापराला चालना द्या
-
*अन्न व औषध प्रशासनातर्फे बर्फ, शितपेय, आईस्क्रीम* *विक्रेत्याकडून ५० अन्न नमुने विश्लेषणासाठी ताब्यात*
-
*वाय.सी.एम.हॉस्पिटल रक्तकेंद्रांतर्गत शहरात ‘ऐच्छिक रक्तदाता शपथेचे वाचन करून जागतिक रक्तदाता दिन’ मोठ्या उत्साहात साजरा*
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr09 12:16
- Humidity 13%
- Pressure 1016
- Winds 5.14mph
now
24℃
-
Fri Apr10sky is clear
- HI/LO: 26/16℃
- Humidity: 26
- Pressure: 1017
- Winds: 6.73
-
Sat Apr11sky is clear
- HI/LO: 26/15℃
- Humidity: 43
- Pressure: 1018
- Winds: 7.78
-
Sun Apr12sky is clear
- HI/LO: 27/15℃
- Humidity: 34
- Pressure: 1018
- Winds: 7.74
-
Mon Apr13sky is clear
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 18
- Pressure: 1017
- Winds: 7.75
-
Tue Apr14few clouds
- HI/LO: 31/18℃
- Humidity: 17
- Pressure: 1015
- Winds: 7.38
-
Wed Apr15overcast clouds
- HI/LO: 34/18℃
- Humidity: 19
- Pressure: 1008
- Winds: 6.9
Check your twitter API's keys


















































