पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी हनुमंत रामदासी, उपाध्यक्षपदी सिद्धांत चौधरी यांची बिनविरोध निवड
पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
जय परशुराम सेवा संघाच्या
संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी; कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
पिंपरी-चिंचवड : जय परशुराम सेवा संघ पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेत हनुमंत रामदासी यांची शहराध्यक्षपदी तर सिद्धांत चौधरी यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीमुळे संघटनेत नव्या नेतृत्वाला संधी मिळाली असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवड प्रक्रियेवेळी उपस्थित मान्यवरांनी नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवीन शहराध्यक्ष हनुमंत रामदासी यांनी संघटनेच्या बळकटीसाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली. तसेच समाजहिताचे विविध उपक्रम राबवून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या निवडीमुळे जय परशुराम सेवा संघाच्या कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठ मार्गदर्शक अशोक काका मुळे,
शशिकांत तुळशे, महेश जोशी गुरुजी, सल्लागार शशिकांत कुलकर्णी गुरुजी, सभासद सदस्य सागर जोशी,लक्ष्मण कुलकर्णी, संदिप कुलकर्णी आणि सर्व सदस्य मोठ्या उपस्थित होते.



















































