पुलाचे ”सरकार शितोळे सेतू” असे केले जाणार नामकरण
पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी, दि. ५ एप्रिल २०२६ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मुळा नदीवरील सांगवी – बोपोडी पुलावरील विद्युत रोषणाई व सुशोभीकरण या कामाचे लोकार्पण तसेच पुलाचे ‘सरकार शितोळे सेतू’ अशा नामकरणाचा समारंभ सोमवार दि. ६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता सांगवी येथे आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती महापौर रवि लांडगे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमास केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांची विशेष उपस्थिती असणार आहे. तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर रवि लांडगे असणार आहेत. याशिवाय विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, सुप्रिया सुळे, श्रीरंग आप्पा बारणे, डॉ. अमोल कोल्हे, महेश लांडगे यांची या कार्यक्रमास विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर मांडेकर, महापालिकेच्या उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी याशिवाय शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, शहर सुधारणा समिती सभापती संजय काटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी माई पठारे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे तसेच नगरसदस्य हर्षल ढोरे, बापू उर्फ शत्रुघ्न काटे, विठ्ठल उर्फ नाना काटे, शाम जगताप, शशिकांत कदम, नगरसदस्या तृप्ती कांबळे, उज्ज्वला ढोरे, अनिता काटे, कुंदा भिसे, शकुंतला धराडे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे तसेच नगरसदस्य, नगरसदस्या व अधिकारी यांची उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांनी केले आहे.



















































