प्रभाग क्र.३४ मधील विविध ठिकाणी चोकअप असलेल्या व खराब झालेल्या सर्व ड्रेनेज लाईनच्या दुरूस्तीची कामे माननीय नगरसेवक प्रसन्न दादा जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच पूर्ण केली आहेत. यामध्ये प्रभागातील दामोदर नगर मधील गौरीशंकर सोसायटीतील ड्रेनेज लाईनला रॉडी मारून ही लाईन क्लीअर करण्यात आली. केदार नगरीतील गाडला गेलेला चेंबर खोदून काढत जेटिंग मशीनद्वारे गाळ काढण्यात आला. तरडे कॉलनीतील ड्रेनेज लाईनला रॉडी मारून येथे देखील जेटिंग मशीनद्वारे गाळ काढून ही लाईन क्लीअर करण्यात आली. आशिष अपार्टमेंट येथील ड्रेनेज लाईनला तसेच आनंद विहार गौरीशंकर सोसायटीतील ड्रेनेज लाईनला रॉडी मारून या ड्रेनेज लाईन देखील क्लीअर करून देण्यात आल्या.
कोरोना महामारीच्या संकट काळात सुद्धा पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या अत्यावश्यक सेवा आहेत त्या करून घेण्याचे काम नगरसेवक प्रसन्नदादा जगताप मित्र परिवाराच्या वतीने होत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या परिस्थितीत देखील नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असणाऱ्या या ड्रेनेज लाईनच्या दुरूस्तीची व देखभालीची कामे होत असल्यामुळे या सर्व परिसरातील नागरिकांकडून आनंद आणि समाधान व्यक्त होत आहे.





















































