: स्वातंत्र्य दिनादिवशी संध्याकाळी माहीने स्वतःची निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही वेळातच सुरेश रैनानेदेखील निवृत्त होत असल्याचे सांगितले. भारतीय क्रिकेटमध्ये सुरेश रैनाचे अमूल्य योगदान आहे. भारताकडून खेळताना त्याने अनेक सामने एकहाती जिंकले असून टी-२०मध्ये बराच काल सुरेश रैनाचा दबदबा होता. रैनाने इंस्टाग्राम पोस्टमध्ये धोनी सोबतचा एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. त्यामुळे एका पाठोपाठ एक असा दुसरा धक्का क्रिकेट रसिकांना बसला आहे.
सुरेश रैनाने फोटो शेअर करत लिहिले की, “ माही, तुझ्यासोबत खेळणे हा एक प्रेमळ आणि अप्रतिम अनुभव होता. मी पूर्ण अभिमानाने तुझ्यासोबत या प्रवासात तुझ्यासोबत आहे. धन्यवाद भारत, जय हिंद!” अशा आशयाची भावनिक पोस्ट त्याने केली आहे. धोनी आणि रैना यांनी एकाच दिवशी एकाच वेळी निवृत्ती जाहीर केल्याने, क्रिकेटचाहत्यांसाठी हा अचानक बसलेला धक्का आहे.