नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती स्वीकारली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून धोनीने निवृत्त झाल्याचे इंस्टाग्रामवर एक व्हिडियो पोस्ट टाकून बातमी दिली. या व्हिडीओमध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. त्याशिवाय या व्हिडीओला ‘मै पल दो पल का शायर हूँ,’ हे गाणे शेअर करत निवृत्तीची घोषणा केली आहे. “तुम्ही दिलेल्या प्रेमाबद्दल आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. संध्याकाळी ७.३० पासून मला निवृत्त समजावे,” असा मथळा त्याने या पोस्टसोबत लिहला आहे.
भारताचा माजी कर्णधार धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी निवृत्त होत असला तरीही तो आयपीएलमधून खेळणार असल्याची माहिती देण्यात येत आहे. त्याच्या या निर्णयाने जगभरातील क्रिकेट प्रेमींना खूप मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी धोनीने भारतीय कसोटी संघातूनही असाच धक्का देत निवृत्ती जाहीर केली होती. भारताला विजयाची सवय लावणारा हा माही सामना न खेळता निवृत्त होत असल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ‘तुला याहून चांगला निरोप समारंभ मिळणे अपेक्षित होते’ अशी इच्छा चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
स्वातंत्र्य दिनादिवशी महेंद्रसिंग धोनीचा क्रिकेट संन्यास.
Share this: