दोन हजार विद्यार्थी-विद्यार्थिनीचा सहभाग
पुणे :(ppcnews.in)
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) आणि डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटी च्या वतीने शनीवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत अकरावा ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ साजरा करण्यात येणार आहे.महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तसेच डॉ.पी.ए.इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार,सचिव प्रा.इरफान शेख यांनी ही माहिती पत्रकाद्वारे दिली.संस्थेच्या विद्यालयांमधील दोन हजारहून अधिक विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच शिक्षक सहभागी होणार आहेत.हा प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम आझम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स (आझम कॅम्पस,पुणे कॅम्प) येथे होणार आहे. त्याचा सराव सुरु असल्याचे ‘आझम स्पोर्ट्स अकादमी’चे संचालक डॉ.गुलझार शेख यांनी सांगितले.





















































