लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे आज दीर्घ आजाराने निधन झालं.ते७४ वर्षाचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयामध्ये आज अखेरचा श्वास घेतला. पेशाने सिव्हिल इंजिनियर असलेले संझगिरी मुंबईतील महानगरपालिकेमध्ये आधी उच्च पदावर ती कार्यरत होते. पण क्रिकेट आणि मराठीतील साहित्यातला रुचीन त्यांच्यातील क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेट रसिकांनी त्यांच्या लिखाणाला पसंतीची नेहमीच दाद दिली आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रांत कारकीर्द केली, त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. तेथून ते २००८ मध्ये मुख्य अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प म्हणून सेवानिवृत्त झाले. त्याचबरोबर त्यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सूत्रसंचालक म्हणूनही आपली एक वेगळी ओळख बनवली.
१९७० च्या उत्तरार्धात लेखन कारकीर्द सुरू करून, त्यांच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी ‘दिनांक’ आणि ‘श्री’ यासारख्या मासिकांमध्ये नियमितपणे योगदान दिले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रांसह ‘एकच षटकार’ हे पाक्षिक क्रीडा मासिक सुरू केले, ज्यासाठी संझगिरी यांनी कार्यकारी संपादक म्हणून काम केले.
१९८० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरींनी ‘आज दिनांक’, ‘सांझ लोकसत्ता’, ‘मिड-डे’, ‘तरुण भारत’, ‘पुढारी’ आणि इतर अनेक प्रकाशनांसाठी स्तंभलेखन करायला सुरुवात केली. लोकसत्तामधील त्यांचे क्रीडा लेख आणि प्रवासवर्णनसंबंधीत स्तंभ खूप गाजले. संझगिरी हे २५ वर्षांहून अधिक काळ ‘सामना’ या मराठी वृत्तपत्रासाठी अनेक क्रिकेट स्पर्धा कव्हर करत आहेत.
द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३पासून ते आजपर्यंतचे सर्व एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट विश्वचषक देखील कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक समस्या, क्रीडा आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहिली आहेत.
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धापासून संझगिरी एकपात्री स्टँडअप टॉक शो करत आहेत आणि त्यांनी आजपर्यंत हजाराहून अधिक असे कार्यक्रम केले आहेत.
सुनील गावसकर आणि गुंडप्पा विश्वनाथ यांचा त्यांच्या ६०व्या वाढदिवसानिमित्त सत्कार, सचिन तेंडुलकरांच्या विक्रमी ३५व्या कसोटी शतकानिमीत्त त्यांचा सत्कार, १९७१ च्या इंग्लिश मालिका विजेत्या भारतीय संघाचा सत्कार आणि सचिन तेंडुलकरांचा सर्वात अलीकडचा त्यांची पन्नास वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सत्कार अशा अनेक मोठ्या कार्यक्रमांची संकल्पना आणि अंमलबजावणीही त्यांनी केली आहे.
‘बोलंदाजी’ या स्पोर्ट्स दूरचित्रवाणी कार्यक्रमसाठी ते प्रस्तुतकर्ता होते आणि ‘मधु इथे अन् चंद्र तिथे’ या अजून एका दूरचित्रवाणी कार्यक्रमाचे पटकथा लेखक होते.
क्रिकेट विश्लेषक आणि तज्ज्ञ म्हणूनही ते विविध टीव्ही चॅनेल्सवर नियमितपणे दिसतात.
२००४पासून, द्वारकानाथ संझगिरी ‘ती रा की ट धा’ आणि ‘स्वरा आर्ट्स’ या संस्थांनी सादर केलेल्या संगीतमय कार्यक्रमांसाठी सूत्रसंचालन करत आहेत. या संगीतमय कार्यक्रमांमध्ये हिंदी चित्रपट आणि संगीत उद्योगातील दिग्गजांना संगीतमय श्रद्धांजली दिली जाते.




















































