पि.पी.सी.न्यूज; प्रतिनिधी अजय जाधव!
फुगेवाडी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे आधुनिक पद्धतीने सुशोभिकरण व्हावे याकरता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत गेली तीन वर्षापासून फुगेवाडी तील नगरसेविका स्वाती माई चंद्रकांत काटे त्यांचा पाठपुरावा सुरू होता. महापालिका अधिकारी माननीय आयुक्त साहेब यांच्याशी परिपूर्ण पाठपुरावा करून सदर विकासकामाचा ठराव पास करून नुकताच घेण्यात आल.
आज शुक्रवारी भूमिपूजनाच्या समारंभ समस्त फुगेवाडी येथील गावकरी रहिवासी यांच्या सहकार्याने साकार झाला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्याप्रसंगी नगरसेविका स्वाती माई काटे, नगरसेवक राजाभाऊ बनसोडे, नगरसेविका आशा शेंडगे मनपाचे सर्व अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. सुशोभीकरणाच्या कामाबद्दल सर्व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले.





















































