रोटरी क्लब ऑफ पुणे सहवास २०२०-२१ या वर्षाचा पदग्रहण समारंभ डिजिटल माध्यमातून संपन्न झाला. समारंभास प्रमुख पाहुणे या नात्याने नियोजित प्रांतपाल रश्मी कुलकर्णी उपस्थित होत्या. क्लबच्या अध्यक्षपदी श्री किरण इंगळे सेक्रेटरी श्रीयुत प्रकाश अवचट आणि इतर संचालकांची नेमणूक झाली. किरण इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना. डिस्ट्रिक्ट ३१३१ चे दोन लाख डॉलरचे ड्रीम प्रोजेक्ट जसे वॉटर शेड प्रोजेक्ट, 20000 मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि महिला सबलीकरण यामध्ये सहभागी होण्याचा मनोदय व्यक्त केला. महिला सबलीकरण कार्यक्रमाअंतर्गत रोटेरियन किरण इंगळे यांनी गॅलॅक्सी मोटार ड्रायव्हिंग स्कूल मधून 11 महिलांना शास्त्रोक्त प्रशिक्षण देण्याचे व त्यांना स्वतंत्र व्यवसायास मार्गदर्शन करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. तसेच रक्तदान शिबिर ही चळवळ राबवण्याचा मानस आहे त्याचबरोबर तरुणांना रोजगारावर मार्गदर्शन शिबिर तसेच समाजाभिमुख कार्यक्रम घेण्याचा इरादा व्यक्त केला.
हा कार्यक्रम डिजिटल माध्यमातून संपन्न झाला असला तरीही सुमारे शंभर जणांची उपस्थिती लाभली होती.रोटेरियन किरण इंगळे यांनी मावळते अध्यक्ष रोटेरियन चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडून सूत्रे स्वीकारली. या समारंभास अवचट श्रीयुत इंगळे श्रीयुत कुलकर्णी आणि श्रीयुत काळे उपस्थित होते.





















































