पि. पी. सी. न्यूज; प्रतिनिधीअजय जाधव!
लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना महावितरणकडून राज्यभर भरमसाट बिले आली. ती संपूर्ण माफ करा अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय रिपब्लिकन फेडरेशन ऑफ इंडियाचे पुणे जिल्हाध्यक्ष फिरोज छोटू खान यांनी एका निवेदनाद्वारे पुणे महावितरणचे संचालक अंकुश नले यांना दिला आहे.
फिरोज खान यांनी आपल्या निवेदनात करणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात लोक कर्जबाजारी झाले. महावितरणने ‘विज मारी’संकट आणले.विशेष म्हणजे सरासरीने वीज बिल देण्यात येते असे सांगत गेल्या सहा महिन्याच्या सरासरी बिलाच्या कितीतरी पट अधिक दिले पाठवली.
या परिस्थितीत भरमसाठ व चुकीच्या रकमेची बिले भरण्याचा तगादा महावितरण कंपनीने नागरिकांच्या मागे लावला आहे. परिणामी वीज बिलांचा अतिरिक्त बोजा नागरिकांवर पडला आहे. हा आर्थिक भार नागरिकांना पेलवणार नाही .या परिस्थितीत केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महावितरण कंपनीने सर्व नागरिकांचे सरसकट लॉकडाउन च्या काळातील सहा महिन्याचे वीज बिल माफ करावे. उर्वरित वीज बिलाची दुरुस्ती करून देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. व सहा महिन्याचे वीज बिल माफी न झाल्यास भारतीय रिपब्लिकन फेडरेशन तर्फे राज्यभर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा महावितरण कंपनीला ईशारा देण्यात आला.





















































