पि. पी. सी. न्युज; प्रतिनिधी अजय जाधव!
देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांना जयंतीनिमित्त असंघटित कामगार काँग्रेसकडून अभिवादन करण्यात आले.
असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे यांनी इंदिराजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हा समारंभ सुंदर कांबळे यांच्या कार्यालयात पार पाडण्यात आला. यावेळी शीतल कोतवाल, अझर पुणेकर, दिलीप साळवे, मोहन उनवणे, संजय साळवी, अतुल जाधव, लहू उक्रंडे, नौशाद शेख, हिना बागवान आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान चांद बागवान यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह पक्षात प्रवेश केला. यावेळी असंघटित कामगार काँग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, हजर पुणेकर यांनी चांद बागवान यांना हातगाडी पठारी भोसरी विधानसभा अध्यक्षपदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.





















































