काळेवाडी : प्रतिनिधी: (ppcnews.in):साहित्यसम्राट, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे 105 वी जयंती काळेवाडी येथील तापकीर नगर येथे लहुजी हिंदु सेना यांच्या वतीने दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे माऊली ग्रुप महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सचिन कांबळे ,युवा नेते राजदादा तापकीर, लहुजी हिंदू सेनेचे संस्थापक अध्यक्ष अजय ढवारे, आनंद तेलंगे, सचिन घोलप हे उपस्थित होते.
यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी हिंदू धर्मातील विषमतेमुळे जातिव्यवस्थेची चटके सहन केले. अस्पृश्यतेच्या जातीमुळे त्यांना बालपणीचे शाळा सोडावी लागली ते मुंबईला जाऊन गिरणीत काम करू लागले व तेथील दलित आणि शोषित कष्टकऱ्यांसाठी त्यांनी लढा दिला. अण्णाभाऊंची सामाजिक, राजकीय ,सांस्कृतिक विषयावरील समता वाढू लागली. आपल्या गाण्यातून, पोवाड्यातून ते समाज प्रबोधन करू लागले त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक कादंबऱ्या, पोवाडे लिहून समाज प्रबोधन केले असे प्रतिपादन अमोल तेलंगे यांनी केले .

यावेळी राजू जगताप, विकी गायकवाड ,गणेश थोरात ,संकेत ढवारे, रामा कांबळे ,किशोर साठे, सार्थक ढवारे ,अनिकेत ढवारे, गणेश चंदनशिवे, साईराज थोरात, संकेत थोरात ,ओम जगताप, अर्णव तेलंगे हे उपस्थित होते.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करताना त्यांचे विचारे समाजापर्यंत पोहोचावे, अण्णाभाऊंचा विचार हा सर्वांनी आत्मसात करावा अण्णाभाऊनी समाजासाठी आपले आयुष्य गोरगरीब कष्टकरी कामगार बांधवांसाठी घातले ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली .जग बदल घालुनी घाव, सांगूनी गेले मला भीमराव हे गीत अण्णाभाऊ साठे यांनी लिहिले. अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या, पोवाडे लिहून समाज प्रबोधन केले असे मत संतोष ढवारे यांनी व्यक्त केले व त्यांनी सर्वांचे आभार मानले या कार्यक्रमाला संपूर्ण लहुजी हिंदू सेनेचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















































