
कोविड- 19 साथीच्या उद्रेकामुळे जगभरात तयार झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक फर्ग्युसन रोडवरील वैशाली हॉटेल चे मालक जगन्नाथ शेट्टी यांनी एक करोड रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता जगन्नाथ शेट्टी फाऊंडेशन’तर्फे महाराष्ट्र शासनाचे एचडी ओ संतोष कुमार देशमुख यांना पुण्यातील कलेक्टर ऑफिस येथे देण्यात आला.
कोविड- 19 चा सर्वाधिक फटका बसलेल्या आणि अर्थार्जनापासूनही दूर राहावे लागत असलेल्या गरजू लोकांना अन्नधान्य, जेवण आणि अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार आहे. यामुळे स्थलांतरित कामगारांचे सर्वात जास्त नुकसान झाले आहे, कारण लॉकडाउनमुळे आर्थिक कामकाज पूर्णपणे बंद आहे.
या सामाजिक बांधिलकीविषयी वैशाली हॉटेल चे मालक जगन्नाथ शेट्टी म्हणाले, ‘कोविड- 19 हे प्रत्येक सीमा ओलांडत असलेले आव्हान आहे. या साथीमुळे रोजंदारीवर जीवन जगणाऱ्यांचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे. पुण्यात काही वर्षांपासून कार्यरत वैशाली हॉटेल या नात्याने कोविड- 19 विरोधातल्या लढ्यात सहभागी होणे आणि नागरिक व समाजासाठी सुरक्षित तसेच निरोगी वातावरण तयार करणे हे आमचे कर्तव्य आहे.’ याचाच एक भाग म्हणून आम्ही म्हणूनच आम्ही ही छोटीशी मदत केली आहे.



















































