पुणे:- पुणे महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारी कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरूवात सिंहगड रोड परिसरातील अभिरूची मॉल समोरील मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये करण्यात आली. याचे उद्घाटन खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले.
यावेळी हेमंत पवार यांनी ही लस घेतली. याप्रसंगी अँड. प्रसन्न घन:शाम जगताप, डॉ. अजितसिंह पाटील, राजा लायगुडे, हरिदास चरवड, कुमार, आनंद दांगट, अश्विनी पोकळे, राजश्री नवले, ज्योती गोसावी, विकासनाना दांगट, वास्तु विशारद कुमार, दादा पोकले, स्वाती पोकले सुरेश गुजर निलेश गिरमे, वॉर्ड ऑफिसर जयश्री काटकर, मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. अमित शहा, आरोग्य अधिकारी डॉ दिपक पखाले, डॉ.वैशाली जाधव, चंद्रकांत लाड आदी उपस्थित होते.