अनोखी सांगीतिक आराधना
1) कलेचा वारसा लाभला कसा लाभला? कुटुंबातूनच कलेचा वारसा मिळाला का?
=हो ,मला कुटुंबातून लहानपाणी पासून कलेचा वारसा लाभला . माझे वडील पं. रघुनाथजी खंडाळकर यांच्या कडून लाभला , मधुसूदन कुलकर्णी सर यांच्या कडे देखील मी गायनाचे धडे गिरवले ते माझ्या बाबांचे गुरु आहेत .. आणि आत्ता गेली १० वर्षे डॉ.पं.अजय पोहनकर यांच्याकडे मी शिक्षण घेत आहे .
2) या क्षेत्रातच का आलात? या क्षेत्राने आतापर्यंत तुम्हाला काय दिले?
=घरातच गायन असल्याने आपसूकच मी या क्षेत्रात आलो .जे दिले आत्ता पर्यंत ते याच क्षेत्राने दिले.मी लहानपणापासूनच बाबांच्या बरोबर अनेक मैफलींना जायचो त्यामुळे प्रोफेशन म्हणून आपसूकच या क्षेत्राकडे वळालो.आणि चांगला गायक म्हणूनच आराधना करायची आहे .
3) या क्षेत्रात आज प्रगती करीत आहात त्याचे श्रेय कोणाला जाते?
= आई-बाबा हेच प्रथम गुरु असतात त्यामुळे मी याचे श्रेय आई बाबांना देईन.पं अजय पोहनकर आणि पं मधुसूदन कुलकर्णी यांना देखील श्रेय देईन कारण आज मी आहे तो त्यांच्या मुळेच आहे..
4) या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकवून ठेवणे किती अवघड आहे? ते तुम्ही कसे करता?
= टिकवणे नक्कीच अवघड आहे हे खरय पण रियाझ सातत्य आणि आराधना या मुळेच सारे शक्य आहे. त्यातूनच परिपक्व कलाकार होऊ शकतो. फळाची अपेक्षा न करता काम केले तर त्याची नंतर सुंदर अनुभूती मिळू शकते .
5) फावल्या वेळात तुम्ही कोणता छंद जोपासता?
= गाण्यानंतर मला क्रिकेट देखील आवडते त्यामुळे ते पण मी खेळतो फावल्या वेळात .वेब सिरीज बघतो मला फिरायला देखील आवडते
6) तुमचे भविष्यातील नियोजन काय आहे? पुढील काळात तुम्ही काय करणार आहात?
= माझा लहान भाऊ शुभम आणि मी आम्ही क्लासिकल ड्यूएट गाण्याचा प्रयत्न करतो भविष्यात ते गाण्याची आणि सातत्य ठेवण्याची खूप इच्छा आहे .शेवट पर्यंत सोबत गाऊ अशी इच्छा आहे .मी एका तमिळ प्यार प्रेमा काधल या चित्रपटात गायलो आहे तसे गाण्याची इच्छा आहे .तसेच तो तेलगु माझे पण डब झाला होता.युवान शंकर राजा यांनी चेन्नईमध्ये गायला बोलावले होते तो खुप अविस्मरणीय क्षण होता.मला भविष्यात कोणत्याही भाषेत कोणत्याही पिक्चर साठी गायला आवडेल हे नक्की .
शब्दांकन – तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादक = पीपीसी न्यूज नेटवर्क ,पुणे)