पुणे : दलित स्वयंसेवक संघ महाराष्ट्र राज्य व अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने अण्णाभाऊ साठे वधू वर सूचक मंडळ सर्वधर्म सर्व समाजासाठी वधू वर सूचक मंडळ चालविण्यात येते. या मंडळाच्या अध्यक्षपदी आण्णा शेंडगे यांची निवड करण्यात आली.
यावेळी दलित स्वयंसेवक संघाचे माजी संघ प्रमुख दादासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. सदर प्रसंगी जिल्हाप्रमुख राजू धडे संपर्कप्रमुख साहेबराव खंडाळे अण्णाभाऊ साठे स्मारक संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मणराव लोंढे, सुजित रणदिवे ,सुभेदार प्रल्हाद कांबळे ,संजय केंदळे, विनोद शिंदे, बाळशीराम पाटोळे आदी उपस्थित होते. ही माहिती सचिव सुजित रणदिवे
यांनी दिली.




















































