पुणे :- पुणे विभागातील ५ लाख ८६ हजार १२४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६ लाख १३ हजार २२७ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या १० हजार ८०८ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण १६ हजार २९५ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६६ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ९५.५८ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ४ लाख ३ हजार ४९७ रुग्णांपैकी ३ लाख ८५ हजार ६९३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण ८ हजार ६८२ आहे. कोरोनाबाधित एकूण ९ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.२६ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९५.५९ टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ५८ हजार २८५ रुग्णांपैकी ५५ हजार ४६३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ९७७ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ८४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ५२ हजार ६८० रुग्णांपैकी ५० हजार ५५ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ७९५ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ८३० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ४८ हजार ४२८ रुग्णांपैकी ४६ हजार ५४० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १३१ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ७५७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ५० हजार ३३७ रुग्णांपैकी ४८ हजार ३७३ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २२३ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ७४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये १ हजार ८१५ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात १ हजार ५४२, सातारा जिल्ह्यात ११३, सोलापूर जिल्ह्यात ९७, सांगली जिल्ह्यात १२ तर कोल्हापूर जिल्ह्यात ५१ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण १ हजार २०२ आहे. पुणे जिल्हयामध्ये १ हजार ३३, सातारा जिल्हयामध्ये ८३, सोलापूर जिल्हयामध्ये ६३, सांगली जिल्हयामध्ये ८ व कोल्हापूर जिल्हयामध्ये १५ रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण ४० लाख ४ हजार २१८ नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी ६ लाख १३ हजार २२७ नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.