“बॉटल्स फॉर चेंज” उपक्रमाअंतर्गत पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या बेंचचे आणि कचरा संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले
2025-26 मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून 219 मेट्रिक टन वापरलेले प्लास्टिक संकलित करण्यात आले
पिंपरी-चिंचवड: : बिसलेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (पीसीएमसी) सहकार्याने आज पीसीएमसी कार्यालय परिसरात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान पुनर्वापर केलेल्या प्लास्टिकपासून बनवलेल्या बेंचचे आणि प्लास्टिक संकलन डब्यांचे अनावरण करण्यात आले. हा उपक्रम बिसलेरीच्या प्रमुख “बॉटल्स फॉर चेंज” कार्यक्रमाचा भाग असून, प्लास्टिक कचऱ्याचे संकलन आणि पुनर्वापर यावर कंपनीचा भर असल्याचे यातून दिसून येते.
उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी बाबासाहेब लांडगे उपस्थित होते. त्यांच्यासोबत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप थेंगल तसेच महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन (एसडब्ल्यूएम) विभाग आणि सीएसआर सेलमधील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. बिसलेरी तर्फे सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभागाचे संचालक के. गणेश उपस्थित होते.
के गणेश, संचालक, सस्टेनेबिलिटी आणि कॉर्पोरेट अफेअर्स विभाग, बिसलेरी इंटरनॅशनल यांनी सांगितले की, कचरा जिथे तयार होतो तिथेच त्याचे योग्य वर्गीकरण करण्याबाबत जनजागृती, विविध जनजागरण मोहिमा आणि शैक्षणिक संस्थांशी केलेले सहकार्य यांच्या माध्यमातून बिसलेरी आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने कचरा व्यवस्थापनासाठी एक यशस्वी आणि व्यावहारिक मार्ग दाखवला आहे. भारतात योग्य कचरा व्यवस्थापन ही अपवादात्मक गोष्ट न राहता ती एक सामान्य सवय व्हावी, यासाठी बिसलेरी विविध संस्थांसोबत भागीदारी करण्यास कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
श्री रवी बाबासाहेब लांडगे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) यांनी बिसलेरीच्या पीसीएमसी महानगरपालिकेसोबतच्या भागीदारीबद्दल आपले विचार व्यक्त करतांना सांगितले, “बिसलेरीसोबतची आमची भागीदारी ही कंपन्या आणि प्रशासकीय संस्था जेव्हा एकत्रितपणे काम करतात, तेव्हा त्या काय साध्य करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहे. कंपनीच्या या उपक्रमांमुळे शहरातील मोठ्या प्रमाणातील कचरा लँडफिलमध्ये जाणार नाही, नागरिकांमध्ये कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता वाढेल आणि सर्क्युलर इकॉनॉमीसाठी मजबूत पाया तयार होईल.”
डॉ. प्रदीप थेंगल, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापालिका आयुक्त व आरोग्य विभाग प्रमुख यांनी पुढे सांगितले, “मोठ्या प्रमाणावर कचरा व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यासाठी मजबूत प्रणाली उभारण्यावर आमचा भर आहे. बिसलेरीचा ‘बॉटल्स फॉर चेंज’ हा उपक्रम अधिक टिकाऊ आणि संसाधनांचा योग्य वापर करणाऱ्या शहराकडे जलदगतीने पुढे जाण्यास मदत करत आहे.”
महापौर आणि आरोग्य विभागाचे उप महानगरपालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडमधील 8 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या संस्थांनी वर्षभर त्यांच्या कॅम्पसमध्ये सातत्याने प्लास्टिक कचरा संकलन केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात “बॉटल्स फॉर चेंज” उपक्रमाच्या 2025–26 या वर्षातील परिणामांचे सादरीकरणही करण्यात आले. बिसलेरीने भारतभरातील महानगरपालिका, विविध संस्था आणि नागरिकांसोबत मिळून 30,309 मेट्रिक टन प्लास्टिक कचरा संकलित करून तो पुनर्वापरासाठी पाठवला आहे.
पीसीएमसी सोबतची ही भागीदारी बिसलेरीच्या महानगरपालिकांशी असलेल्या सहकार्याच्या सातत्यपूर्ण विस्ताराचे प्रतीक आहे. या माध्यमातून समुदायांना योग्य कचरा व्यवस्थापनाच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. हे सर्व उपक्रम कंपनीच्या “ग्रीनर प्रॉमिस” मोहिमेचा भाग आहेत, ज्यामध्ये प्लास्टिकचा पुनर्वापर वाढवणे, समुदाय आधारित पुनर्वापर पद्धतीला प्रोत्साहित करणे, जलसंधारणाला मदत करणे आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन व्यवस्था उभारणे यांचा समावेश आहे.



















































