पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : भारतीय जनता पक्षातील स्वीकृत नगरसेवक पदांच्या निवडीवरून शहरात अंतर्गत नाराजी व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. पक्षाचे कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी फेसबुक पोस्टद्वारे या प्रक्रियेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
काळभोर यांच्या म्हणण्यानुसार, पक्षासाठी दीर्घकाळ निष्ठेने काम करणारे, तसेच नागरी प्रश्नांसाठी आंदोलने व मोर्चे काढणारे कार्यकर्ते यांना डावलले जात आहे. त्याऐवजी आमदार, खासदार, मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्या समर्थकांना स्वीकृत नगरसेवक पदांमध्ये संधी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, सोमवारी स्वीकृत नगरसेवक पदांसाठी नावे जाहीर केली जाणार असल्याची माहिती असून, या निवड प्रक्रियेवरून पक्षांतर्गत असंतोष वाढत असल्याचे दिसून येत आहे.

सचिन काळभोर ह्यांनी व्हाट्सअप सेटटस वर व फेसबुक वर पोस्ट शेअर करून नाराजी व्यक्त केली असून त्या ठिकाणी कमळ चिन्ह व सचिन काळभोर हे स्वीकृत नगरसेवक पदी नियुक्ती करण्यात येणारे नवीन कार्यकर्ते ह्याचा संदर्भात संताप व्यक्त करुन शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे भारतीय जनता पार्टी व आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री ह्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे.



















































