पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपळे गुरव,कै.काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल येथील आरोग्य कोठी मधे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त कार्यरत असलेल्या आपल्या आरोग्य कर्मचारी बांधवांना वाढत्या उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण मिळावे,या हेतूने आमदार शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनात ओम साई फाउंडेशनच्या अध्यक्ष संजय मराठे यांच्या वतीने आरोग्य साहित्याचे वाटप करण्यात आले.
हे कर्मचारी रणरणत्या उन्हात आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी आणि आरोग्यासाठी झटत असतात.सध्या मोठ्या प्रमाणातील उष्माघाताचा धोका लक्षात घेता,त्यांना उनापासून बचाव करण्यासाठी टोपी,अँप्रन आणि या उन्हाळ्यात वाढलेल्या प्रदूषणामुळे मास्क नगरसेवक माऊली जगताप आणि ओम साई फाउंडेशनच्या अध्यक्ष संजय मराठे यांच्या हस्ते देऊन समाज उपयोगीकार्य करण्यात आले.अशा संवेदनशील विचारांमुळेच समाजात आपुलकी आणि जबाबदारीची भावना अधिक दृढ होते.

समाजासाठी झटणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची जाणीव ठेवत ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष संजय मराठे हे दरवर्षी असेच समाज उपयोगी उपक्रम करीत असतात यांनी केलेला हा उपक्रम खरोखरच माणुसकीचे उत्तम उदाहरण आहे याप्रसंगी बोलताना सामाजिक कार्यकर्ते साई कोंढरे म्हणाले.
सर्वांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या आणि ऊन वाढत आहे,स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्या असे आवाहन यावेळी नगरसेवक माऊली जगताप यांनी केले.
याप्रसंगी नगरसेवक माऊली जगताप ओम साई फाउंडेशन चे अध्यक्ष संजय मराठे,स्नेहल सोनवणे (आरोग्य निरीक्षक),अरुण जगताप (आरोग्य मुकादम),सुनील धावारे (बेसिक वॉर्ड इन्चार्ज),सामाजिक कार्यकर्ते तौफिक सय्यद,रमेश गाढवे,साई कोंढरे,सचिन खराडे,जगदीश बच्छाव आणि आरोग्य अधिकारी कर्मचारी,नागरिक उपस्थित होते.



















































