पुणेः- कमकुवत जागतिक निर्देशांदरम्यान भारतातील सोन्याच्या वायदाचे दर आज दहा महिन्यांच्या नीचांकावर गेले. एमसीएक्सवरील सोन्याचे वायदे 0.11 टक्क्यांनी घसरून 45,500 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. चांदीबद्दल बोलायचे म्हणले तर, चांदीचा वायदा प्रति किलो 69,216 रुपयांवर स्थिर राहिला. ऑगस्ट 2020 मध्ये सोने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीपेक्षा 10 हजार रुपये कमी आहे.
जागतिक बाजारपेठेत इतकी आहे किंमत
जागतिक बाजारात सोन्याचा भाव 0.2 टक्क्यांनी घसरून 1,734.16 डॉलर प्रति औंस झाले. इतर मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.3 टक्क्यांनी घसरून 26.67 डॉलर प्रति औंसवर, तर पॅलेडियम 0.6 टक्क्यांनी वाढून 2,377.50 डॉलरवर बंद झाला. प्लॅटिनम 0.3 टक्क्यांनी घसरून 1,200.50 डॉलरवर बंद झाला.
अमेरिकन फेडरल रिझर्व बेज बुक बुधवारी येत आहे. तेल उत्पादकांच्या गटाची बैठक गुरुवारी होईल. या व्यतिरिक्त, अमेरिकन कारखान्याच्या आदेशाची आकडेवारी गुरुवारी जाहीर केली जाईल. प्रारंभिक बेरोजगार दावे आणि वस्तूंच्या ऑर्डरचा डेटा शुक्रवारी जाही केला जाईल. या आठवड्यात, या मोठ्या घटनांनर सोन्याच्या व्यापारांची नजर असेल.
दहा महिन्यांच्या स्वस्त दरात सोन्याची विक्री करीत आहे सरकार
जर तुम्हाला सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे. केंद्र सरकारने सार्वभौम गोल्ड बाँड योजना सुरू केली आहे. 12 व्या सार्वभौम सोन्याच्या बाँडची मालिका 1 मार्चपासून सुरू झाली आहे आणि आपण त्यात मार्चपर्यंत गुंतवणूक करू शकाल. ही योजना चालू आर्थिक वर्षाची शेवटची मालिका आहे. यामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावेळी सॉव्हर्विन गोल्ड बाँडची किंमत दहा महिन्यांत सर्वात कमी आहे, म्हणजेच 10 महिन्यांच्या निम्न स्तरावर आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सोन्याच्या सबस्क्रिप्शनची किंमत यावेळी प्रति ग्राम 4,662 रुपये निश्चित केली आहे. आपण ऑनलाईन अर्ज केल्यास तुम्हाला प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट मिळेल. याचा अर्थ असा की, आपण एक ग्रॅम सोन्यासाठी 4,612 रुपये खर्च कराल.