*महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत दक्षता बाळगावी -डॉ. अजिता केंद्रे,*
*पिंपरी : दिनांक १२ मार्च २०२५ :* मुली आणि महिलांनी स्वतःच्या आरोग्याबाबत दक्षता बाळगून नियमितपणे आरोग्य तपासणी करायला हवी असे आवाहन आदित्य बिर्ला हॉस्पिटलच्या सल्लागार रेडिएशन ऑन्कोलॉजिस्ट डॉ.आजिता केंद्रे यांनी केले. जागतिक महिला दिनानिमिताने यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या चिंचवड येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कर्करोग जनजागृतीपर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता महिलांनी जीवनशैली आरोग्यदायी करण्यासाठी कसे बदल करावेत, तसेच प्रतिबंधात्मक उपाय,मानसिक आरोग्याचे महत्व आदींबद्दल डॉ. अजिता केंद्रे
यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी विद्यार्थिनी आणि अन्य महिला कर्मचाऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत शंका समाधान केले आयआयएमएसीच्या एमबीए विभाग प्रमुख व आयक्यूएसी समन्वयक डॉ. वंदना मोहंती यांनी डॉ. अजिता केंद्रे यांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला एमबीए,एमसीए च्या विद्यार्थिनी आणि संस्थेतील महिला प्राध्यापक आणि अन्य कर्मचारी उपस्थित होत्या. महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती व्हावी या हेतूने आदित्य बिर्ला रुग्णालयाच्या सहकार्याने हा कार्यकम राबवण्यात आल्याचे आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी सांगितले . डॉ. मधुरा देशपांडे यांनी आभार प्रदर्शन केले.





















































