मुंबई :- बॉलिवूड अभिनेता आर. माधवन याला देखील कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याने ट्विटरवर त्याच्या प्रकृतीविषयी माहिती दिली. आर माधवनने ‘३ इडियट्स’ चित्रपटाचा उल्लेख करुन ट्विट केले की, “फरहानला रांचोचा पाठलाग करावा लागला… व्हायरस हा नेहमीच आमच्या मागे होता आणि यावेळी त्याने आम्हाला आपल्या जाळ्यात पकडले. पण काही हरकत नाही आणि मी लवकरच बरा होईल.’
माधवन आणि आमिर खान यांनी २००९ मध्ये ‘३ इडियट्स’ चित्रपटात एकत्र काम केले होते. ही तीन मित्रांची कहाणी होती, त्यात माधवन फरहान, आमिर रांचो तर शर्मन जोशी राजूची भूमिका साकारली होती. आमिर खानला बुधवारी संसर्ग झाल्याचे समजले. माधवनने सर्व चाहत्यांना त्याला शुभेच्छा दिल्याबद्दल आभार मानले.
सोमवारी माधवनने आपल्या आगामी ‘अमेरिकन पंडित’ या चित्रपटाच्या सेटचा व्हिडिओ शेअर करुन लिहले होते की, “भोपाळमध्ये सर्व सावधगिरी बाळगून शूटिंग सुरु आहे”. मध्य प्रदेशात बुधवारी कोविड १९ चे १,७१२ नवीन संक्रमित प्रकरणे समोर आली. कार्तिक आर्यन, मनोज बाजपेयी, रणबीर कपूर आणि सतीश कौशिक यांनाही कोरोना विषाणूची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले. कौशिक सध्या शहरातील रुग्णालयात दाखल आहे. मुंबईत कोविड -१९ च्या १,१८५ नवीन घटना घडल्यानंतर बुधवारी संक्रमित लोकांची संख्या ३,७४,६११ झाली होती.