पुणे (खराडी):- जागतिक महिला दिना निमित्ताने शिवसेना खराडी चंदननगर परिसरातील महिला सफाई कर्मचाऱ्यांचा स्व. गणेश राजाभाऊ चौधरी लोकसेवा प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी शिवसेना शहर संघटक राजाभाऊ चौधरी शिवसेनेचे काळूराम थोरात, प्रशांत मोझे, उमेश ताकवले, शहानुर शेख, अमोल राव, सफाई महिला कर्मचारी, अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजाभाऊ म्हणाले की, कोरोना काळामध्ये ज्या प्रमाणे डॉक्टर, नर्स, पोलिस कर्मचारी यांच्या बरोबरीने सफाई महिला कर्मचारी यांनी सुद्धा समाजासाठी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जागतिक महिला दिनाचे निमित्ताने त्यांचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे.
प्रतिष्ठानच्या सचिव प्रियांका दरगुडे-चौधरी म्हणाल्या की, सफाई महिला कर्मचारी आपल्या आरोग्याची पर्वा न करता आपला परिसर स्वच्छ ठेवतात. एक महिला म्हणून मला त्यांच्याबद्दक आदरच आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून समाजात महिला काम करतात. याचा अभिमान वाटतो. आयोजन अध्यक्ष दौलत राजाभाऊ चौधरी, सचिव प्रियांका दरगुडे -चौधरी यांनी केले.





















































