पुणे:- दिनांक १ जुलै २०१६ पासून शासकीय, निमशासकीय व सामाजिक संस्थांमधील ५ टक्के खेळाडूंना आरक्षणांतर्गत वितरीत करण्यात आलेल्या क्रीडा प्रमाणपत्राची पडताळणी दिनांक १२ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०:३० ते सायंकाळी ५:३० वाजेपर्यंत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा यांच्या दालनामध्ये करण्यात येणार आहे, असे क्रीडा व युवक सेवा उपसंचालक विजय संतान यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
क्रीडा कार्यालयाकडून वितरीत करण्यात आलेल्या पॉवरलिफ्टींग, स्क्वॅश, सॉफ्टबॉल, कनोईंग अँड कयाकिंग, सेपकटकरा, आईस हॉकी या क्रीडा प्रकारातील प्रमाणपत्राची पडताळणी २३ मार्च रोजी घेण्यात आली होती. त्यावेळी सुनावणीपासून वंचित राहिलेल्या खेळाडूंसाठी १२ एप्रिल रोजी पुन:श्च आयोजित करण्यात आली असून सर्व खेळाडूंनी सुनावणीकरीता उपस्थित रहाण्याचे आवाहन उपसंचालक संतान यांनी केले आहे.





















































