ppcnews.in
नवी सांगवी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक अंतर्गत प्रभाग क्रमांक ३१ मधील लढत आता जोरात रंगात आली असून, सर्वच पक्षांचे उमेदवार आपापल्या परीने विजयासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र या पार्श्वभूमीवर नवी सांगवी व गणेशनगर परिसरात कप-बशी या निवडणूक चिन्हाचा गजर घुमताना दिसत असून, नवी सांगवीकरांची पहिली पसंती ठरलेल्या पसरणीकर पायल अमित यांना नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे.
प्रभाग क्रमांक ३१ची भौगोलिक रचना, त्यानंतर झालेल्या तिकीट वाटपातील कथित अन्याय आणि प्रभागाचा योग्य समतोल न राखल्यामुळे नवी सांगवी परिसरात अस्वस्थता होती. नवी सांगवी व काही भागात मतदारसंख्या अधिक असूनही कोणत्याही पक्षाने येथील स्थानिक उमेदवार न दिल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात होती. “नवी सांगवीकरांवर अन्याय होत नाही ना?” असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात होता.

या पार्श्वभूमीवर पसरणीकर पायल अमित यांच्या रूपाने नवी सांगवीकरांना एक सक्षम आणि तगडा पर्याय मिळाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सर्व *नवीसांगवी पिंपळेगुरवकर* एकजुटीने त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याने प्रचाराला मोठा उत्साह मिळाला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुक व कार्यकर्त्यांचीही एकजुटीने साथ पसरणीकर पायल अमित यांना मिळत असून, त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होत असल्याचे नागरिक मध्ये बोलले जात आहे.
नवी सांगवी येथील अमित पसरणीकर यांचे कार्यकर्त्यांचे मोठे आणि मजबूत जाळे असून, करोनाकाळात केलेल्या सामाजिक कार्यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष विश्वास निर्माण झाला आहे. याच कारणामुळे पसरणीकर कुटुंबाला नवी सांगवीतील नागरिकांची पहिली पसंती मिळत असल्याचे चित्र आहे.
नवी सांगवीतील नागरिक मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे प्रचारात सहभागी होत असून, याआधी झालेल्या कथित अन्यायाला उत्तर देण्यासाठी एकजुटीने मतदान करण्याचा निर्धार व्यक्त करत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ३१ मधील लढत अधिकच चुरशीची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




















































