पुणेः- कस्तुरबा मार्ग पोलिश स्टेशनच्या, मुंबई अंतर्गत आलेल्या एका केस मध्ये पोलीस सब इनिस्पेक्टर राम शेंगडे यांच्या निदर्शनास ३१ दिवसाचे एक बाळ आले. त्यांनी त्या बाळाला त्वरित डॉ.बाबासाहेब आंबेडकर शताब्दी हॉस्पिटल, कांदिवली पूर्व इथे पोलीस कॉन्स्टेबल विद्या वांगा यांच्या देखरेखीखाली अॅडमिट केले.
बाळाला ऍडमिट केल्या नंतर उपचारा दरम्यान बाळाला ओ निगेटिव्ह सारख्या लवकर उपलब्ध न होणाऱ्या रक्तगटाच्या ५० मिली अलॉगट रक्ताची गरज आहे, असे डॉक्टरांनी राम शेंडगे यांना कळवले. ही माहिती कळताच राम शेंडगे यांनी लगेचच हेलपिंग हँडस फॉर ब्लड चे राहुल साळवे यांना संपर्क करून बाळाला लागणाऱ्या रक्ता संदर्भात माहिती दिली. आणि त्यानंतर ३१ दिवसाच्या बाळासाठी ओ निगेटिव्हचे रक्त शोधण्यासाठी राहुल साळवे यांनी आपले प्रयत्न सुरू केले आणि अखेरीस जेजे महानगर रक्तपेढीच्या दिपाली सुर्वे आणि निलेश बच्चाव यांच्या सोबत बोलून त्या बाळासाठी मोफत रक्त उपलब्ध करून दिले. रक्त उपलब्ध होताच पोलीस कॉन्स्टेबल विद्या वांगा यांनी बाळाच्या रक्ताचे नमुने जेजे महानगर रक्तपेढी येथे घेऊन जाण्यास निघाले.
या सर्व प्रयत्नांना यश येत, सध्या डॉक्टरांचे बाळावर उपचार सुरू आहेत. बाळाला योग्य वेळी रक्त उपलब्ध करून दिल्या बद्दल हेलपिंग हँडस फॉर ब्लड चे राहुल साळवे आणि जेजे महानगर रक्तपेढीचे दिपाली सुर्वे व निलेश बच्चाव यांचे सर्व स्थरातून कौतुक केले जात आहे. सब पोलीस इनिस्पेक्टर राम शेंडगे, पोलीस कॉन्स्टेबल विद्या वांगा, राहुल साळवे, दिपाली सुर्वे, निलेश बच्चाव यांच्या प्रयत्नाने आणि यांनी दाखवलेल्या माणुसकीने बाळ लवकरच बरे व्हावे यासाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.