पिपीसी न्यूज;अजय जाधव!
पुणे:पोलिस रेकॉर्डवरील प्रशांत डोंगरे या गुन्हेगाराला नुकतेच पांडवनगर या भागातून अटक करण्यात आली. गुरुवार दी.१७ जून रोजी युनिट १ चे अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार सचिन जाधव दत्ता सोनवणे यांना खबऱ्या मार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की पोलिस रेकॉर्डवरील प्रशांत डोंगरे हा विटकर बंगला पांडवनगर येथे आला असून त्याच्याकडे घातक हत्यार आहे. सदर ठिकाणी पोलिसांचे पथक जाऊन आरोपीस ताब्यात घेतले असता व त्याच्या जवळ विचारपूस करता आरोपीचे नाव प्रशांत विश्वास डोंगरे (वय १९, रा.३३७/९५४ मीटर बंगला, पांडवनगर, पुणे) राहता पत्ता असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी ची अधिक झडती घेतली असता त्याच्याकडे ४ हजार किमतीचे ५ लोखंडी कोयते सापडले. पोलिसांनी आरोपीस अटक करून चतुर्शिंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवून पुढील कार्यवाही व तपास चतुर्शिंगी पोलीस स्टेशन कडे सुपूर्द केला.
सदरची कामगिरी पोलीस अंमलदार सचिन जाधव, दत्ता सोनवणे, अशोक माने, आयाज दड्डिकर, शशिकांत दरेकर व महेश बामगुडे यांनी केली आहे.